अजीर्णमंजिरी-भाग एकोणतीसावा

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

🌿 *अजीर्णमंजिरी* 🌿
🌿भाग एकोणतीसावा 🌿
🌿 *15/2/2018* 🌿

आठळ्या पचायला जड असल्याने, ज्यांची भूक कमी/ अग्नि मंद आहे, अशांनी मात्र आठळ्या खाऊ नयेत.

आठळ्यानंतर जरा बघूया *कच्च्या फणसाकडे*.
कच्च्या फणसाचे गरे चवीने तुरट, गोड, वातकारक , पचायला जड, मलावष्टंभ करणारे , दाहकर, बलदायक, कफ-मेद वाढवणारे आहेत.

त्यामुळेच कच्च्या फणसाची भाजी कितीही आवडत असली तरी उद्या होणारा त्रास विचारात घ्यावाच लागतो. मलावष्टंभ , वाढणारा वात हे टाळण्यासाठी पुन्हा तेच की भरपूर खोबरेल तेलाच्या फोडणीतच ही भाजी केली जाते. त्यावर भरपूर ओला नारऴ घातला जातो. शिवाय खाताना त्यावर कच्चे खोबरेल ओतून घेऊनच ही भाजी खाल्ली जाते. तरच या भाजीचा निर्भेळ आनंद मिळू शकतो.

*पिकलेला फणस* मात्र आपण लपवूही शकत नाही. अख्ख्या परिसरात त्याचा वास दरवळत असतो. खायचा मोह तर होतोच होतो.
याच्या दोन जाती एक कापा (घट्ट ) आणि दुसरा बरका (रसाळ )
पिकलेले गरे गोड , स्निग्ध , थंड , वातनाशक, बलवर्धक , ताकद देणारे , मांस आणि कफ वाढविणारे , शुक्र वाढविणारे आहेत. चवीला अवीट गोड. त्यामुळे पटापट खाल्ले जातात. पण पचायला जड असल्याने योग्य ती काळजी मात्र घ्यावीच लागते.

ती काय बरं ?

गरे खाल्ल्यावर *पाणी पिऊ नये.* तरीही रसाळ गऱ्यांवर पाणी चालू शकते.
*पण काप्या गऱ्यांवर ते खाण्यापूर्वी आणि खाल्ल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नये. त्यावर खोबरे खावे. त्याने गरे पचतात.*

एवढ सांभाळूनही जर गऱ्यांचे अपचन झालेच तर *एखादे वेलची* *केळे किंवा आंबावडी (आंब्याची बर्फीपरंतु खवा घालतेली नाही.आंबानारळवडी )खाऊन पोटाला आराम दिला तर गरे सहज पचून जातात.*

निसर्गाची पण देणगी कशी आहे बघा…केळे तर कायम मिळतेच. पण फणस मिळतो उन्हाळ्यात , आंबाही मिळतो उन्हाळ्यातच ! आणि *दोघेही कोकणात*👍🏻 !!

(भाग 2 )

🌿 *वैद्या विनया लोंढे* 🌿
विक्रोळी मुंबई
9819817050
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s