अजीर्णमंजिरी-भाग अठ्ठाविसावा

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

🌿 *अजीर्णमंजिरी* 🌿
🌿 *भाग अठ्ठाविसावा* 🌿
🌿 *14/2/2018* 🌿

खायला सुमधुर पण फोडायला किंवा कापायला तितकेच अवघड असे एक कोकणी फळ म्हणजे *फणस* .

कच्च्या फणसापासून पिकलेल्या फणसापर्यत नव्हे, अगदी गऱ्याच्या आतील बी म्हणजेच आठळीपर्यंत प्रत्येक भागाचा आस्वाद घेता येतो.

फणसाच्या बिया मीठाच्या पाण्यात शिजवून किंवा मुंबरात (निखाऱ्यात) भाजून, त्याचे जाड साल काढून खाण्याची प्रथा आहे.

भरपूर तेलाच्या खमंग फोडणीवर शिजवून या बियांची भाजी केली जाते किंवा अळू सारख्या काही भाज्यांमध्ये या बिया चिरून, साले काढून, वापरल्या जातात.

फक्त पावसाळ्यात मिऴणारे फळ आणि बियाही. त्यामुळे कोकणातली लाल माती आणि रखा ओली करून आठळ्यांना लावून कडक उन्हात सुकवून ठेवण्याची पद्धत आहे. मग वर्षभर टिकतात, नंतर कधीही वापरता येतात.

अशी ही फणसाची बी गुणांनी कशी आहे बरं ?
फणसाची बी गोडरसाची, पचायला जड, मूत्राची प्रवृत्ती करणारी , मलाला बांधून ठेवणारी असून वीर्यवर्धक गुणाची आहे.

आठळीमुळे पोटात गॅस तयार होतो. त्यावर एक उपाय करावा. थोडासा ओवा गरम पाण्याबरोबर घ्यावा की गॅस गायब.

याचबरोबर आठीळ मलाला बांधून ठेवणारी असल्याने ती वापरताना भरपूर तेल आणि खोबरे (नारळ) वापरले की मलावष्टंभ टाळता येतो.

तसा फणसाचा आणि तेलाचा निकटचाच संबंध आहे असं म्हटल तर अतिशयोक्ती होणार नाही.

अगदी कच्चा किंवा पिकलेला फणस चिरताना / गरे वेगळे करताना खरी अडचण येते ती त्याच्या पांढऱ्या, एकदम चिक्कट अशा चीकापासून आपल्या हाताची/सुरीची/विळ्याची सुटका करून घेताना !😃
आणि इथे केवळ *तेलच* कामाला येते. हाताला, सुरीला, विळीला आधी तेल लावून मगच फणसाला हात लावावा, की तो चीक अजिबात कुठेही चिकटत नाही.

यावरून एक लक्षात येतेय का बघा, फणसाच्या चीकाचा चिक्कटपणा जर तेलाने जातो तर आपल्या शरीरातील /आतड्यातील चिकट मल रोजच्या आहारातील तेलाने जाणार नाही का ?👍🏻
(भाग 1)

🌿 *वैद्या विनया लोंढे* 🌿
विक्रोळी मुंबई
9819817050
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s