अजीर्णमंजिरी-भाग सव्वीसावा

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

🌿 *अजीर्णमंजिरी* 🌿
🌿 *भाग सव्वीसावा* 🌿
16/1/2018

बर! मग या *केळ्याचे अपचन* झाले तर औषध काय ?

थोडेसे कोमट *साजूक तूप* पोटात घेणे . खूप भूक लागेपर्यंत निवांत… तोंड एकदम बंद .
झाल ना काम सोप्प !!

केळे खाण्याबाबत अजून एक चूक सहजपणे केली जाते .ती म्हणजे साधारणपणे जेवल्यानंतर केळे खाण्याचा बर्याच जणांचा रिवाज असतो. खरंतर भरलेल्या पोटी केळे खाऊ नये. कफ वाढणारच ..सुस्ति येणारच , वजनही वाढणारच.
बरं ! आपण जेवताना केळ्यासाठी पोटात जागा ठेवलेली असते का ? निश्चितच नाही.

मग *केळे खावे कधी* ?
अहो ,एक साधी युक्ती वापरायची . केळे पचण्यासाठी तूप वापरायचं तर मग केळे कुस्करून त्यात दोन चमचे तूप घालून त्याबरोबर पोऴी / चपाती खाल्ली तर ?

लहान मुलांना अगदी सुरूवातीपासूनच अशी सवय लावली तर मुलांना जँम, लोणचे, सॉसेस यापासून लांब ठेवता येण खूप सोप्प होईल. नाही का ?

जी लहान मुले खूप केळी खातीत त्यांना वेलची केळी द्यावीत. *त्यावर लगेच पाणी/ सरबत /कोल्ड्रींक पिणार नाहीत* याची काळजी घ्यावी.

केळ्याची दूध आणि साखर घालून केलेली *शिकरण* हा तर गोडखाऊंचा वीकपॉईंटच.
फळ आणि दूध एकत्र करून खाऊ नये , ते विरुद्ध आहारात मोडते.
जेवणात रोज गोड लागतेच अशी एक जमात असते , त्यांचा शिकरण हा सोयीस्कर मार्ग असतो. करायला सोपा असल्याने नियमितपणे शिकरण आहारात असते. सततच्या दूध आणि केळे (फळे ) संयोगाने त्वचेचे रोगही होऊ शकतात.

यासाठी *कोकणातली शिकरण* करण्याची पद्धत शिकून घ्यायची. दूधाऐवजी नारळाचा रस आणि साखरेऐवजी गूळ वापरायचा.

अशी शिकरण एकदा खाल्ली की नक्की पटेल , की आदरणीय गदिमांनी …
“मामाची बायको सुगरण , रोज रोज पोळी शिकरण ” असं का म्हटलय ?

🌿 *वैद्या विनया लोंढे* 🌿
विक्रोळी मुंबई
9819817050

Advertisements

अजीर्णमंजिरी-भाग पंचविस

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

🌿 *अजीर्णमंजिरी* 🌿
🌿 *भाग* *पंचविस* 🌿
🌿15/1/2018🌿

सहजपणे उपलब्ध होणारे व सर्वांना परवडणारे असा परिचय असलेले फळ म्हणजे *केळे* . कधीही उपलब्ध ! तेलकट नाही ! तिखट नाही ! सालामधे सुरक्षित असते. म्हणूनच कामानिमित्त दिवसभर बाहेर असलेल्या व्यक्तिंचा पोटाला आधार म्हणून केळे खाण्याकडे कल असतो. फूलापासून पिकलेल्या केळ्यापर्यंत वापरता येणारे हे फळ आहे.

अतिशय दुर्मिळ अशी भाजी म्हणजे *केळफूलाची* *भाजी* . केळफूल तुरट आणि गोड चवीची असते. पचायला जड, स्निग्ध, वात आणि पित्त कमी करणारे आहे. याची भाजी मधुमेही रूग्णांना चांगली असते.

सहजासहजी करता येण्यासारखी ही भाजी नाही. ही भाजी करताना केळफूल सोलणे हे एक अवघड काम आहे. प्रत्येक फूलातील मधोमध असणारा पुंकेसर काढून टाकून ती फूले बारीक चिरावी लागतात. साफ करताना आणि चिरताना आपले हात आणि भाजीही काऴी पडत जाते , *त्यामुळे* *ती* *ताकाच्या* *पाण्यात* *चिरून* *टाकतात* . मग काऴी न पडता पांढरीशुभ्र रहाते. जोडीला थोडेसे भिजवलेले शेंगदाणे, चवळी इत्यादी वापरून, भरपूर तेलात मोहरी हिंगाची खमंग फोडणी देऊन ही भाजी तयार होते..अतिशय चविष्ट. खाल्ल्यावर सगळे कष्ट सत्कारणी लागल्यासारखे वाटतात.

फूलानंतर *कच्च्या* *केळ्याचाही* मस्त वापर करता येतो.
कच्चे केळे किंचीत तुरट गोड रसाचे, जड, कफकारक आहे. जैन लोक बटाट्याऐवजी केळ्याचा वापर करतात. केळ्याचे पीठ, वेफर, केळ्याची भाजी असे नानाप्रकार करता येतात. बटाट्याएवढे वातूळ नसल्याने व्यवहारात बटाट्या ऐवजी वापरायला हा अतिशय चांगला पर्याय आहे.

सर्वसामान्यपणे *नैसर्गिक* *पिकलेले* केळे गोड, थंड, स्निग्ध, पचायला जड, कफकारक, शुक्रवर्धक, मलावष्टंभक, दाहनाशक, रक्त- पित्त शामक आणि पौष्टिक असे फळ आहे.
नैसर्गिकरित्या पिकलेले केळे शरीराला बल देणारे आहे.
वेलची केळे पचायला आणि आरोग्यालाही सर्वात चांगले.

ज्यांच्याकडे केळीची बाग किंवा दोन चार झाडे आहेत त्यांना माहीतच असेल की घडातील केळी फुलापासून देठापर्यंत क्रमाने सावकाश पिकतात.

आणि विकत आणलेल्या केळ्याचे काय होते ?
सगळी केळी एकदमच पिकलेली असतात. (की केमिकल वापरून पिकवलेली असतात ?)
तर बऱ्याचदा लहान मुलांना फक्त केळंच आवडतात आणि एकावेळी बरीच केळी खाण्याचा सपाटा लावतात.

थोडक्यात काय तर केळी खाणे अति झाले तर त्याचेही अपचन होतेच.
मग केळ्याच्या अपचनाला औषध काय ?
बघूया पुढच्या भागात !

(भाग 1)

🌿 *वैद्या विनया लोंढे* 🌿
विक्रोळी मुंबई
9819817050
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

थंडी आणि सांधेदुखी

थंडी आणि सांधेदुखी

थंडी पडायला सुरुवात झाली की अनेकांना सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.बऱ्याच जणांना उठता बसताना गुडघे कटकट वाजू लागतात.हात टेकल्याशिवाय उठता येत नाही.
सकाळी उठल्यावर हात पाय यांचे सांधे एकदमच आखडलेले असतात.हाताची बोटे मुडपता येत नाहीत त्यामुळे कणीक भिजवणे, भाज्या चिरणे, कपडे धुणे, पिळणे अशा कामांमध्ये बायकांना फार अडचण येते.पुरुषांनाही गाडी चालवणे, किक मारणे , कॉम्प्युटर वर टाईप करणे अशा कामात अडथळा येतो.
मान, पाठ, कंबर आखडणे, दुखणे, गुडघ्यांना सूज येणे यामुळे नियमित सगळ्याच कामात व्यत्यय येतो शिवाय सततच्या दुखण्यामुळे जीव वैतागून जातो.
बरेचदा सांध्यांना सूज आली तर साधी साधी कामं करणं देखील अशक्य होऊन जातं , सगळ्या कामांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून रहावं लागतं.
याचं प्रमुख कारण म्हणजे या दिवसात वाढलेली थंडी आणि हवेतील कोरडेपणा! वात दोष हा गारठा आणि कोरडेपणामुळे खूप वाढतो आणि शरीरात वेदना निर्माण करतो.
ज्यांची मूळ प्रकृती वाताची आहे त्यांना हे बदल प्रकर्षाने जाणवतात.
यासाठी आहार आणि विहार दोन्ही गोष्टीत बदल करावा लागतो.
आहारात दूध, तूप, सुका मेवा अशा स्निग्ध गोष्टींचा समावेश करायला हवा. हरबरा डाळ, डाळीचे पदार्थ, भाकरी, कडधान्ये , थंड पाणी, शीतपेये यांचा वापर टाळायला हवा.
सकाळच्या थंडीत सर्व प्रकारच्या कामांसाठी गरम पाणी वापरायला हवे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शरीराला आवश्यक असणारी स्निग्धता पुरवण्यासाठी शरीराला नियमितपणे तेल लावायला हवे.तीळ तेल, खोबऱ्याचे तेल, बदामाचे तेल यापैकी किंवा काही औषधी सिद्ध अभ्यंग तेल अंगाला चोळायला वापरले तरी चालेल.
नंतर अंगाला उटणं चोळून अतिरिक्त तेलकटपणा घालवावा आणि मग कडकडीत पाण्याने अंघोळ करावी.
ज्यांना सांधेदुखीचा त्रास होतो त्यांनी मात्र गरजेचे औषधोपचार करावेत.त्याच प्रमाणे शास्त्रीय पद्धतीने मसाज ( स्नेहन, अभ्यंग), स्वेदन म्हणजे औषधी वाफारा घेणे तसेच बस्ति , पिंडस्वेद , तैलधारा असे उपचार वैद्याच्या सल्ल्याने करून घ्यावे .
आयु:श्री हॉस्पिटलमध्ये आमच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या अनुभवावरून असे अनेक उपचार, पॅकेजेस आम्ही विकसित केले आहेत ज्यांचा आजवर हजारो रुग्णांना फायदा झाला आहे आणि त्यांच्या वेदना कमी करून त्यांचे दैनंदिन जीवन सुखी करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
तेव्हा या, या थंडीच्या दिवसांत आपणही आपल्या तक्रारींचे निवारण करून हा थंडीचा ऋतू आनंददायी बनवा.
वैद्य राजश्री कुलकर्णी
M. D.( आयुर्वेद)

Ayushree Ayurvedic Hospital and Research Centre
34, Parab nagar, Near Swami Samartha Kendra, Indiranagar Nashik 422009
Tel 0253 -2322100
Email ayurweb@gmail.com
Website – http://www.ayushree.com

MAKAR SANKRANT – THE AYURVEDA PERSPECTIVE

MAKAR SANKRANT – THE AYURVEDA PERSPECTIV

 

 

India is a land of festivals. We Indians celebrate all these festivals with lots of fun and enthusiasm. Ayurveda explains 6 rutus (seasons) where every 2 rutus clubbed together,  explains three seasons in a year as per modern calender. All these festivals are associated with various rituals and tasty delicacies with slight variations as per the state and customs carried there. It wont seem an exaggeration if I say, we almost have one festival every month. eg- We have Ganpati festival associated with Modakin varsha rutu (monsoon), then we have Dasshera followed by kojagri pournima, Sharad rutu (october heat) where in we relish flavoured milk cooled down by moonlight. Diwali – where we enjoy various sweet and salty recepies fried, baked, roasted all yummy and healthy comes in Hemant rutu (beginning of winter). And With the start of the new year comes Makar Sankranti, shishir rutu (peak of winter).

Now one may wonder, why so many festivals alongwith so many other celebrations in a year? Din’t our forefathers have any work to do? Others may say – they just enjoyed their life to the core, with frequent family get togethers and relishing various delicious recepies every now and then, wow what a life! While others may say they din’t have much of entertaining things to do or be with, so these were the ways to enjoy.

Well… these things may be partially true, but our ancestors were pretty smart, enjoyment and get togethers surely make your life happy, easens your work and other stress, meeting friends and family personally, gives more happiness than wishing them on social networking sites.

The most important aim of the delicacies associated with festivals – Ayurveda suggests change in diet as per the rutu (season) – as the climate changes with the season so does the internal body environment; namely agni, and dosha levels. The food items used in preparing the particular delicacies, is an indication, that all these foods items and other foods with similar properties should be consumed and also used in various recepies, in this season (Seasonal regimen).  These dietary changes maintains dosha dhatu balance in the body and also prevents the common seasonal health complaints.

Makar sankranti is celebrated mostly on 14th january every year (Shishir rutu); wherein the weather is extremely cold, the digestive fire in the body is very well kindled. Vata dosha is predominant in the nature and the body, cold breeze blowing around and body demands for some heat and oleation, skin and hair appears dull and dry.

So here comes the special delicacies – Sweets like Til gul ladoo or chikki (A preparation made with seasme seeds, jaggery, dry coconut and peanuts), Gulachi poli (a flat wheat bread or roti stuffed with jaggery, sesame seeds, crushed peanuts) and served with lot of ghee, niger seeds, sesame seed, peanut, nuts are used to make chutneys and also used to make various preparations. Kheer made of dry dates and other dry fruits is a special treat.

The veggies and food like beans, peas, green grams, carrots, raddish, bajra, sugarcane, Indian jujube fruits(bor/ber) are harvested in this season. Women arrange a small gathering at the homes and exchange these sweets and food items as a token of love and health. People fly kites in the air, This increases the social bonding and love (sneha). Sneha reduces vata in the body and hard feelings among people, they stay connected and spread happiness.

A day prior to the Makar sankrant is called bhogi, where a mixed vegetable is prepared with all the above mentioned veggies and flavoured further with peanut and niger seeds. This is served with bajra roti roasted along with sesame seeds.

All these food items are snigdha (here snigdha literally means presence of oil content) in nature, hot in potency, heavy to digest and so takes good care of the kindled Agni, thus maintaining the tridoshic balance. These foods pacifies vata and kapha and increases pitta (heat)in the body. Being snigdha gives glow and nourishment to the body internally, strengthens the bones and stores the body energy for the upcoming year.They also provides the luster, nourishment and glow to the skin, nails, bones, joints and hair. Strong bones and joints in turn keeps you active and away from joint pain issues. In short you can say it is a power package of winter super foods.

Happy Sankrant…. stay fit, be happy and stay healthy with Ayurvedic guidance ,natural seasonal and local foods.  And as it is said in Marathi -TIL GUL GHYA GOD GOD BOLA.

Vd.Shweta V. Labde
Mob- 9860834246
Seven Ayurveda Care,
Flat no.5, Sapna society, above Peter England Showroom, Karve road,
Kothrud, Pune-411038

Visit us at – http://www.ayurvedalive.in
http://www.sevenayurveda.com

Fundamentals of Ayur Immunity Booster – Methi (fenugreek seeds) ke laddu.

Fundamentals of Ayur Immunity Booster – Methi (fenugreek seeds) ke laddu.
What is meant by immunity booster foods? The foods or a recipe which helps to build capacity or strength of body to fight with infections and thus keeps us healthy. There are number of immunity booster foods , We usually differentiate them on the basis of seasons.

In this article we are sharing an easy recipe of one of such food along with how coming together of contents creates an healthy effect on our body and helps to boosts our immunity.
Lets see the detailed information about “Methi ke laddu.”

Ingredients-

 1. Fenugreek seeds ( Meethi ) – 50 gms
 2. Edible gum resin ( Gond ) – 50 gms
 3. Dried dates powder ( Khajur ) – 100 gms
 4. Finely cut pieces of fig ( Anjir ) – 100 gms
 5. Almond nut powder ( Badam ) – 100 gms
 6. Cashew powder ( Kaju ) – 100 gms
 7. Black raisins Kala ( Munakka ) – 100 gms
 8. Marking nut karnel powder ( Godambi ) – 100 gms
 9. Walnuts powder ( Akharot ) – 100 gms
 10. Cow ghee – 500 gms

Procedure-

 • First of all grind the fenugreek seeds in mixer grinder & make fine powder of it.
 • Deep fry the given quantity of edible gum resin in cow ghee. After deep frying it bulges out & becomes crispy. Crush the fried edible gum resin.
 • Now in pan take fine powder of fenugreek seeds. Add cow ghee to the pan. The powder should dip in ghee so take ghee according to that.
 • Fry this fenugreek powder in ghee till its color turns slight reddish.
 • The mixture will also have pleasant smell which will be the indicator that you have to stop frying. Keep to cool down.
 • When the fried fenugreek powder comes to room temperature add crushed edible gum resin & other all the ingredients (powder form) to it and mix it thoroughly.
 • Make small balls out of it which we call laddu.
 • Eat this one laddu everyday in winter season.

The functions of ingredients as follows –

 • Edible gum resin, Marking nut karnel, Dried Dates, Fenugreek seeds – They pacify vata dosha. Toughen bones, strengthen muscles.
 • Almond, Walnuts, Cashew, Cow ghee – Improves memory. Boosts grasping powder. Act as brain tonic.
 • Black raisins, Figs, Dried dates – Act on blood as purifier also improves iron (Haem) content of blood. Improve hunger sensation. Also act as an digestive aid.

Here we can see how all the ingredients contribute in every manner to boost the immunity and the overall strength of body. So lets enjoy this delicacy this winter at fullest, & be blessed with long live immunity.

Stay healthy. Stay tuned.

Visit our Youtube channel – Ayurbeej

Dr. Pooja Kashikar
http://www.ayurbeej.com
Contact details- dr.pooja.kashikar@gmail.com

पाणी कोणी कमीच प्यावे?

#स्वस्थायु २ पाणी कोणी कमीच प्यावे? “अहो डॉक्टर मॅडम, तुमच्या औषधाने माझे पडसे थांबले होते मागच्या आठवड्यात पण, आज दुपारपासून पुन्हा चालू झाले हो. काय करू आता? काही कामं उरकली नाही हो जात पटापटा. काहीतरी रामबाण औषध द्या बरं!” देवकाकू…माझ्या पेशण्ट चोंदलेल्या आणि गुलाबी लाल झालेल्या नाकास पुसत वैतागून म्हणाल्या. सौ. देवकाकूंना तपासून पुन्हा काही प्रश्नोत्तरे झाली (history taking हो). काकू म्हणाल्या, “अगं मी चांगली ठणठणीत आहे ग पण हे सर्दीचं काही कळत नाही.” काकूंना मधुमेह आहे हे मी जाणून होतेच. त्यांना विचारले गुपचूप गोडाचे नित्य सेवन तर नाही ना करत? तर त्यावर नकारार्थी मान डोलावली. त्यांना शौचास कशी होते विचारले तर ती सुद्धा तक्रार नाही. मग, बोलता बोलता मला मी बरेच प्रश्न विचारले. तसे हळू हळू त्यांनी सांगितले, अग, पंधरा दिवसांपूर्वी सर्दी झाली ना तेव्हाची औषधे पूर्ण केलीच नाहीत. आराम पडल्यावर बंद केलीत. ती आहेत घरी डब्यात ठेवलेली. हे उत्तर ऐकल्यावर मी अवाक्! मग मात्र त्यांची खोदून खोदून चौकशी सुरु केली तर त्यांनी जे सांगितले ते ऐकून मी पुरती चक्रावूनच गेले. त्यांनी मला एक whatsapp संदेश वाचून दाखवला आणि पाठवलासुद्धा पानी के ज़रिये इलाज प्राकृतिक पैथी के डॉक्टरों ने पानी के ज़रिये कुछ बीमारियों का इलाज किया है। बिना मुंह धोए और बिना कुल्ली किए नहार मुहं 1250ml मतलब 4 बड़े गिलास पानी संभव हो तो जमीन पर पालथी में बैठकर एक साथ पी जाएँ। अब 45 mint तक कुछ भी ना खाएं पीयें । अगर शुरू(starting)में 4 गिलास पानी नहीं पी सकते हैं तो 1 या 2 गिलास से शुरू करें। धीरे धीरे बढ़ा कर 4 गिलास कर दें। मरीज़ ठीक होने के लिए और जो मरीज़ ना हो वह fit रहने के लिए यह इलाज का तरीका अपनाये। Doctors का कहना है कि इस इलाज(इस तरीके से पानी पीने)से बहोत सारी बीमारियाँ जल्दी ठीक हो सकती हैं। बड़े गिलास पानी एक साथ पीने से कोई नुक़सान(side effects) नहीं होता हाँ पेट ज़रूर भर जाता है। 45 mint के बाद भूख लग जाएगी l शुरू(starting) में तीन दिन हो सकता है कि कुछ बार पेशाब जल्दी जल्दी लगे। उसके बाद daily routine के हिसाब से पेशाब आने लगेगा। दुर्दैवाने असे आणि यासारखे अनेक संदेश whatsapp वर आठवड्यातून एकदा तरी येत असतात. काही संदेशांमध्ये काही ***महानुभाव तर चक्क पाण्याचे***पेले सकाळी, दुपारी, संध्याकाळी आज रात्री असे पिण्यास आयुर्वेदाच्या नावाखाली सांगतात. हे वाचून देवकाकूंनी सुद्धा पाणी भरपूर पिण्याचे व्रत अगदी उत्साहात आरंभले. पण, मंडळी असे नाहीये बरं का! आयुर्वेदाने तुम्ही अमूक लिटर पाणी रोज प्यायलेच पाहिजे असे आग्रहपूर्वक सांगितलेले नाही. आयुर्वेद प्रत्येक गोष्टीचे सेवन करतांना आपल्या प्रकृतीनुसार त्या प्रत्येक गोष्टीची मात्रा आणि वेळ पाळायला सांगतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा एक गैरसमज असा असतो की, आपले पचन म्हणजे चावून अथवा चाटून खाल्ले गेलेले पदार्थ उत्तमप्रकारे जठराग्नीद्वारे पचविले जाणे. पण, मंडळी पाणीसुद्धा व्यवस्थित पचायला हवे बरं का! अन्यथा त्याचेसुद्धा अजीर्ण उद्भवते. मंडळी, शरीराला आवश्यक मात्रेपेक्षा अधिक प्रमाणात प्यायलेले पाणी आपल्या मूत्रवह स्रोतसाच्या दोन्ही वृक्कांवर (किडन्या) ताण आणते. मग जेव्हा वृक्कांमार्फत त्याचे उत्तम परिगलन होत नाही तेव्हा त्याचे शरीरावर वाईट परिणाम होतातच! एकीकडे आपण अन्य डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ‘आयुर्वेदाच्या बहुतेक सर्वच औषधांनी वृक्कांवर परिणाम होतो’ असे बेधडक वक्तव्य मान्य करून त्याची पडताळणी न करताच आयुर्वेदाच्या औषधांवर आक्षेप घेतो मग, इथे तर जीवनावश्यक पाण्याच्या अतिरिक्त सेवनाचा आपल्या वृक्कांवर आणि पर्यायाने आपल्या मूत्रवह संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल हे लक्षातच का बरे घेत नाही? पिण्याच्या पाण्यातसुद्धा जीवनावश्यक जीवनसत्वांचा, खनिजांचा समावेश असतो त्यांचा नाही का वृक्कांवर परिणाम होणार? याचा विचार करायला हवा हे पटतंय का मंडळी? ‘आयुर्वेदातील औषधे आणि त्यांचा वृक्कांवर होणारा परिणाम’ हा आपल्या लेखाचा आजचा विषय नाही पण, आयुर्वेदाची सर्वच औषधे असा विपरीत परिणाम करीत नाहीत आणि प्रत्येक औषधाच्या सेवनाचा ठराविक कालावधी असतो तेवढ्या मर्यादित काळापुरतेच त्या औषधांचे सेवन अपेक्षित असते. त्या मर्यादित कालावधीसाठी योग्य पथ्यासह घेतलेल्या औषधांनी असे विपरीत परिणाम उद्भवत नाही, पण, त्यासाठी तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच औषधांचे सेवन केले गेले पाहिजे.. उगीच वर्तमानपत्रे, मासिके वाचून स्वतःची चिकित्सा स्वतःच करू नये. तर मंडळी, देवकाकूंनी सेवन केलेले पाणी शरीराच्या आवश्यकतेपेक्षा अधिक असल्याने आणि त्यातच त्यांना मधुमेह असल्यामुळे सर्दी-पडसे मोठ्या प्रमाणात झाले होते. म्हणूनच ‘आयुर्वेदाने पाणी कोणी कमीच प्यावे’ याबद्दल जे मार्गदर्शन केले आहे ते आज तुम्हा सगळ्यांना सांगायचे ठरवले. आता मात्र, कितीही कोणीही सांगितले तरी आपल्याला जितकी तहान लागेल तितकेच पाणी प्यावे त्यामध्ये आळस करू नये आणि थंडीच्या दिवसांत जेव्हा मुळातच तहान कमी लागते अथवा जे दिवसभर वातानुकूलित वातावरणात असतात त्यांनी पाणी पिण्याची इच्छा झाल्यास घोट-घोटभर कोमट पाणीच प्यावे. नक्की करून बघा आणि आपली सर्दी-खोकला, सूज किती प्रमाणात कमी होते याकडेसुद्धा लक्ष ठेवा आणि मला आवर्जून कळवा! इति आयुर्वेद: उवाच। © डॉ विलासिनी चौधरी १०/०५/२०१६ 9930108310 B.A.M.S. P.G.F.C.P.(PANCHAKARMA) M.A. (SANSKRUT) ayurvipsvpm@gmail.com http://www.swasthayudrvilasinichoudhary.wordpress.com स्वस्थायु क्लिनिक आणि पंचकर्म केंद्र, डोंबिवली (पूर्व)

AYURVEDIC DIETARY RULES -3

In the last blog we started with the Aharvidhi vidhaan, where we discussed about the first dietary rule Ushnam ashniyat, now we shall know more about the second rule –

2. Snigdham Ashniyat

Now we all know ashniyat means to eat, we shall know what exactly snigdha means. A generalized translation of the word ‘snigdha’, may mean oily, (I can notice most of yours eyebrow raised by the word ‘Oily’, and the immediate pop ups into the mind – weight gain, cholestrol, acidity, and lot more).

As mentioned, that would be a mere translation. The word ‘snigdha’ in Ayurveda has various shades – it explains moistness of the food, food texture and quality which will please the body and mind, definitely it also specifies use of oil or ghee in desired proportion which shall provide the necessary lubrication to the body internally and externally, and not the food – deep fried in oil or ghee.

Benefits of Snigdha Bhojan (food)

 • Food with proportionate use of oil, ghee or water, provides proper texture and taste to food. Tasty and healthy food is what makes one happy, physically and mentally, and at the same time energizes the body. Imagine having excessive dry meals without any moistness or lubrication , it will definitely cause difficulty in swallowing it and also exert extra efforts on the body to soften and ultimately digest it. So our tradition always stress on serving a spoonful of ghee with dal/rice/roti, etc.
 • Snigdha food kindles the digestive fire and also eases the process of digestion.
 • Vatanuloman – Proper digestion ensures effortless and normal movement of vata and other doshas, thus maintaining the tridoshic balance. Snigdha property of food also pacifies the rooksha (dry), laghu(excessive lightness), chala(excessive and abnormal movement) property of deranged vata. It normalizes the functions of vata dosha by controlling its movements.
 • It provides nourishment of the body at the cellular level. As we know wear and tear of the body is a natural phenomenon, which is a continuous process. The unctuousness (Snigdha) of the foods like ghee, oil, buttermilk, curd, butter, natural oil content foods like coconut, coconut milk preparations,nuts,and meat etc. helps rejuvenation of the body at the cellular level and thus nourishes the body. As the basic Ayurveda phenomenon explains all the wear and tear in the body is a result of vitiated vata and snigdha food pacifies the vata dosha, and serves the purpose of nourishment.
 • Snigdha ahar increases strength of the body, body muscles, bones and the joints.
 • It pleases and strengthens the senses of the body, thus ensures the proper functioning of the sensory organs.
 • Snigdha food also improves the skin glow, lustre and texture. It maintains the skin tone and elasticity. The same is true in the case of hair. The dry and flaky skin looks dull and dark, this can be corrected with proper intake of ghee in our diet. Overall it enhances the beauty.
 • Remember excessive and improper use of anything is always bad. So food should be cooked with appropriate proportions of oil, ghee, etc and with correct cooking methods. Adding a spoonful or two spoons of ghee to your meals seperately is not going to make you fat, but help you, but similarly unnecessary use of processed fats like margarine, butter, excessive eating of fried foods, mayonnaise, cheese etc is definitely going to harm you.
 • If the food served is dry, you can just club it alongwith supplements like – intermittent sips of water – not the cold aerated drinks – yes it provides the necessary moistness; buttermilk, curd, dals, soups, chutneys, spreads, salad dressings, ghee, butter, etc.
 • So next time You are ready for the meals make sure the food is not only freshly cooked and hot but also Snigdha.

Vd.Shweta V. Labde
Mob- 9860834246
Seven Ayurveda Care,
Flat no.5, Sapna society, above Peter England Showroom, Karve road,
Kothrud, Pune-411038

Visit us at – http://www.ayurvedalive.in
http://www.sevenayurveda.com

हिवाळा आणि त्वचेची काळजी

हिवाळा आणि त्वचेची काळजी

आपल्या पैकी बऱ्याच जणांना विचारलं की कोणता ऋतू आवडतो तर बहुतेकांचं उत्तर असेल की “हिवाळा ” कारण या दिवसांमध्ये उन्हाळ्यासारखी घामाची चिकचिक नसते की पावसाळ्यासारखी ओली रिपरिप , चिखल नसतो.आकाश अगदी निरभ्र असतं, वातावरणात छान गारवा असतो , आरोग्यदायी ऋतू असतो हा!खाण्यापिण्याची चंगळ असते .
पण जसजसा हा गारठा वाढतो , हेमंत ऋतुकडून शिशिर ऋतुकडे आपण जाऊ लागतो तशी ही थंडी बोचरी होते.गार वारे वाहू लागतात .हवा जास्तच कोरडी होते.
वातावरणात जास्त धुरळाही होतो .गारवा जास्त असल्याने तहान एरवीपेक्षा कमी लागते, त्यामुळे पाणीही कमी प्यायलं जातं. या सगळ्या कारणांमुळे शरीर देखील आतून बाहेरून कोरडं होऊ लागते.
हातपाय रुक्ष होतात, फुटतात.टाचांना भेगा पडतात. केस अतिशय कोरडे , खरखरीत होतात, तुटू लागतात. ओठ फुटतात , क्वचित त्यातून रक्तही येऊ लागते.ज्यांची त्वचा मुळातच कोरडी आहे , त्यांना तर हे त्रास जास्त तीव्रतेनं जाणवतात .त्यांची त्वचा माशांच्या खवल्याप्रमाणे भेगाळलेली , फाटलेली आणि अत्यंत रुक्ष दिसू लागते.
केसांची मुळे कोरडी पडतात, डोक्याची त्वचादेखील रुक्ष होऊन बरेचदा कोंड्याच्या स्वरूपात निघू लागते.डोक्यात कंगवा फिरवला की बारीक रव्याप्रमाणे ही त्वचा उडू लागते.त्यामुळे डोक्यात खाजही येऊ लागते.
अनेकांना काही किरकोळ त्वचेचे आजार असतात ते या वातावरणात बळावतात .कोरडी खरूज, त्वचेवर चट्टे उठणं , खाज वाढणं अशा अनेक समस्या जाणवतात.
थंड हवा सतत शरीराला स्पर्श करत राहिल्याने अनेकांना या ऋतूत शरीरावर पित्त उठण्याचा त्रास होतो.अंगावर लाल रंगाची पुरळ येते, प्रचंड खाज येते, क्वचित आगही होते .
ज्यांना सोरायसिस सारखा गंभीर त्वचाविकार आहे त्यांच्या दृष्टीने तर हिवाळा अतिशय त्रासदायक ठरतो कारण अंतर्बाह्य कोरडेपणामुळे त्वचेचे थर रोज कोंड्याच्या स्वरूपात भरपूर प्रमाणात निघू लागतात, खाजेचे प्रमाण खूप वाढते आणि रुग्ण अतिशय त्रस्त होऊन जातो.
या सगळ्या साठी उपाय काय?
थंडावा आणि कोरडेपणा(रुक्षता) हे यातील खरे मूळ शत्रू आहेत.यांचा पाडाव करायचा असेल तर त्यांच्या विरुद्ध गुणांचा भरपूर वापर करायला हवा.
थंडीपासून बचाव करण्यासाठी खाणं, पिणं, कपडे या सगळ्यात उष्ण किंवा गरम गोष्टींचा समावेश करायला हवा.
सकाळी तोंड धुणं, शौच , अंघोळ या सगळ्या कामांसाठी गरम पाणी वापरावे. गरज पडल्यास प्यायलाही गरम पाणी घ्यावं.
अन्न गरम असतानाच जेवण करावं.शीतपेये, आईस्क्रीम यांचा वापर टाळावा.
गरमागरम सूप, सार यांचा वापर करावा.
रात्री तर गरम कपडे, पांघरुणे यांचा वापर करावाच पण दिवसाही अंगात स्वेटर, पूर्ण शरीर झाकले जाईल असे लांब कपडे वापरावे.,
पायात स्लीपर्स घालाव्यात, जास्त थंडी असेल तेव्हा मोजेही घालावेत.डोकं आणि कान यांचं रक्षण व्हावं यासाठी सुती किंवा लोकरीचा स्कार्फ वापरावा.
जेवणात तुपाचा समावेश अवश्य करावा. लोणी खावं.स्निग्ध पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजेत.यासाठी डिंकाचे, अळीवाचे लाडू किंवा नुसता सुका मेवा नियमितपणे खावा.
बाहेरून करायचा सर्वात प्रमुख उपाय म्हणजे अंगाला तेल लावणे!तीळ, बदाम किंवा मोहरीचे, खोबऱ्याचे कोणतेही तेल चालेल फक्त ते लावताना गरम असले पाहिजे आणि त्वचेत मुरले पाहिजे.
ज्यांना त्वचाविकार आहे त्यांनी मात्र केवळ घरगुती उपायांवर विसंबून न राहता औषधे किंवा पंचकर्म यांची गरज आहे की काय यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्यावा हे उत्तम!
आयु:श्री आयुर्वेदीय हॉस्पिटलमध्ये गेली पंचवीस वर्षे संशोधन करून सोरायसिस किंवा तत्सम अनेक त्वचाविकारांसाठी आम्ही काही उपचार प्रणाली विकसित केली आहे ज्यात काही औषधे, पंचकर्म शुद्धीक्रिया याबरोबरच रसायन उपचारांचाही समावेश आहे.
आपली समस्या जाणून घेऊन त्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने निरसन केल्यास प्रत्येकालाच या हेल्दी ऋतूचा आनंद उपभोगता येईल , नाही का?
वैद्य राजश्री कुलकर्णी
M. D.( आयुर्वेद)
आयु:श्री आयुर्वेद हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र,
34 परब नगर, श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ , इंदिरा नगर नासिक 422009
फोन क्रमांक 0253-2322100
Email ayurweb@gmail.com
Website – http://www.ayushree.com

अजीर्णमंजिरी-भाग चोवीस

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

🌿 *अजीर्णमंजिरी* 🌿
🌿 *भाग चोवीस* 🌿
🌿 *7/1/2018* 🌿

प्रत्येकजण ज्याची आतुरतेने वाट बघत असतो असा तो – ग्रीष्म ऋतूत मिळणारा *आंबा* .

*कच्चा आंबा* म्हणजे कैरी. तुरट आणि आंबट रसाची, चव उत्पन्न करणारी, वात आणि पित्त वाढविणारी आहे.

तयार म्हणजेच *पिकलेला आंबा* गोड, किंचित आंबट रसाचा असतो. वातशामक, पचायला जड असून मांस आणि शुक्रवर्धक, बलवर्धक , थंड, कफकर आणि सारक आहे.

नैसर्गिकरित्या पिकलेला, अत्यंत गोड असाच आंबा खावा.

*आंबटसर चवीचा, कृत्रिमरित्या पिकवलेला किंवा अकाली मिळणारा आंबा खाऊ नये.* अशाप्रकारचा आंबा खाऊन भूक कमी होणे , मलविबंध किंवा रक्त /पित्तविकार उद्भवतात.

तसेच चांगला आंबा खाऊनही *जर तो नीट पचला गेला नाही तर तूप हे त्यावर औषध आहे.*

*मिरीपावडर* सुद्धा आंब्याचे अपचन घालविते.
म्हणूनच तर *आमरसात मिरीपावडर घालावी आणि खाताना त्यात तूप घालूनच खावा.* म्हणजे खाताना विचारच करायला नको, पचेल की नाही ?

*थोड्या पाण्यात सुंठपावडर घालून ते पाणी प्याल्यानेही* आंबा छान पचतो.

खरतरं राजा सर्वांचा असतो, पण पचनी पडायला मात्र जरा कठीणच असतो ना ! 😇 पण आंब्याच्या बाबतीत मात्र तसं नाही हं ! आंबा हा खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा राजा कारण त्याला पचवायचे उपाय आपल्या हातात आहेत. नाही का !! 🙂

🌿 *वैद्या विनया लोंढे*🌿
विक्रोळी मुंबई
9819817050
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

AYURVEDIC DIETARY RULES – 2

In the previous blog, we took a glace on 10 dietary rules described in Ayurveda. Today we shall know in details about the first rule.

Ushnam ashniyat – Benefits of having hot food is as under :

 • Ushnam ashniyat means, one should always eat freshly prepared hot food. Ushna – hot and ashniyat – to eat. The fact that food should not merely be hot but also cooked fresh.
 • Eating fresh and hot foods enhances the taste of the food and also pleases the senses. Freshly cooked food retains all the nutritional values of the food, which is otherwise lost in the ready to serve, canned and processed foods.
 • Hot food kindles the digestive fire (Agni), which in turns – fastens the digestion and provides necessary nourishment to all the dhatus of the body and maintains the balance of tridoshas. Healthy Agni is one of the sign of long and healthy life.
 • Vatanuloman – hot food as mentioned prior, helps to undergo proper digestion of food, thus maintaining dosha balance, and ultimately controls the movement of vata, facilitates easy elimination of stools, urine and wind. Disturbed movements of vata is the key to many vata disorders, like bloating, pain in abdomen, chest, backache, constipation, joint pain, etc.
 • Consuming hot foods also absorbs excess kapha produced during the digestion process, and also pacifies kapha disorders as the hot property of food nullifies the cold potency of kapha.
 • Eating cold food increases kapha, cold foods are comparatively heavy to digest.

In countries like India it is not very new to cook food everyday, but with busy work schedules, and various food fads, have grown the culture of ready to eat food, processed and refrigerated foods. Plan your other work accordingly and spare some time for your cooking, as food is our basic necessity for survival. Carry food in well insulated bags.

I agree that it is not always possible to cook and serve hot food everywhere, but the least you can do is, cook your food daily atleast every morning, don’t precook the veggies for 2-3 days and refrigerate. Refrigeration doesnot visibly spoil the food, but only slows down the process of food decomposition. Yes eating roti’s is healthy, but Kneading the flour for a week together, not only spoils its taste and decreases the nutritional value but also exerts load on digestion.

Warm the food before having it, shrug off the laziness and stop having cold food directly from the fridge. When you have to warm the food, make sure you bring the food to room temperature before warming it.

Just because you need to have warm food, don’t reheat the food many times as this can also decrease the nutritive value of the food.

There are also some exceptions to have very hot food, as in bleeding disorders, pitta body type and pitta associated diseases, hot climate, etc. but these are diseased conditions. Afterall our body is the best guide, it always demands the right things as and when needed. It is us who ignore its demand and choose what we want.

So next time when you are hungry, have hot food. Stay fit stay healthy…..

Vd.Shweta V. Labde
Mob- 9860834246
Seven Ayurveda Care,
Flat no.5, Sapna society, above Peter England Showroom, Karve road,
Kothrud, Pune-411038

Visit us at – http://www.ayurvedalive.in
http://www.sevenayurveda.com